* पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य... अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं... हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो. ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे. आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ? फार थोड्या लोकांना.त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही. * मग वैशिष्ट्य कशांत आहे...? पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य कि...